जर तुमच्याही घरामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाला असेल तर तिला जर 75 हजार रुपये मिळणार आहेत, ते मिळवण्यासाठी काय प्रोसेस करायची ते आपण Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra यामध्ये पाहणार आहे.
महाराष्ट्र शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. इतर राज्यांमध्ये mukhyamantri rajshri yojana योजना या नावाने आहे तर महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी ही योजना आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र मध्ये जर मुलीचा जन्म एक एप्रिल 2023 पासून झाला असेल तर ती योजनेसाठी पात्र आहे. या योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे. तर या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तो कसा घ्यायचा, याबाबत आपण Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra in Marathi मध्ये पाहणार आहे.
Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra | लेक लाडकी योजना
ही जी योजना आहे या योजनेबद्दल आपण थोडक्यात एक माहिती पाहूया–
महाराष्ट्र शासन यांनी महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाबाबत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना आणली होती. परंतु या योजनेला अपुरा प्रतिसाद मिळाल्यामुळे एक नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचारधन होते म्हणून त्यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल असे सांगितलेला आहे.
लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यासाठी पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देऊन मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75000 रोख रुपये देण्यात येईल.
Lek Ladki Yojna Amount |लेक लाडकी योजना मध्ये मिळणारे लाभ
मुलीचे वय | लाभ |
मुलीच्या जन्मानंतर | पाच हजार रुपये |
इयत्ता पहिली | सहा हजार रुपये |
इयत्ता सहावी | सात हजार रुपये |
इयत्ता अकरावी | आठ हजार रुपये |
मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर | 75 हजार रुपये |
Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra in Marathi
या योजनेच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या आपण पाहूया –
- लेक लाडकी योजना ही पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये जर दिनांक एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जर जन्माला एक मुलगी किंवा दोन मुली असतील तर त्यातील एका मुलीला त्याचा लाभ लागू होईल.
- पहिल्या आपत्तीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी तसेच दुसऱ्या पत्त्याच्या दुसऱ्या हप्ता साठी जर अर्ज करायचा असेल तर आई-वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जर जुळे अपत्य जन्माला आले असतील एक मुलगी किंवा दोन्ही मुली असेल तर लाभ मिळेल.
- लाभार्थीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असणार आहे.
- लाभार्थीचे बँक खाते हे महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.
Lek Ladki Yojna Document
या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू–
- लाभार्थी मुलीच्या जन्माचा दाखला.
- कुटुंबप्रमुखाचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
- लाभार्थीचे आधार कार्ड.
- लाभार्थीच्या आई वडिलांचे आधार कार्ड
- बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स.
- पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड याची झेरॉक्स
- मतदान ओळखपत्र.
- लाभार्थी मुलगी शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला.
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र.
- शेवटच्या अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती-
लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे जो लेक लाडकी चा फॉर्म आहे तो भरून विहित नमुन्यात भरून अर्ज कागदपत्रासही सादर करावा.
यासाठी जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर अंगणवाडी सेविका तुम्हाला तो अर्ज भरून देतील.
अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची छाननी करून तपासणी करून दर महिन्याला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे यादी सादर करावी. तसेच पुढील यादी वरील अधिकारी यांना देऊन सादर करावी.
पर्यवेक्षिका किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर जर अर्ज संपूर्ण किंवा पूर्ण भरलेला नसेल तर सर्व प्रमाणपत्र सादर केलेले नसतील तर अर्ज मिळाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत पूर्तता करण्याकरता अर्जदारास लेखिका कळवावे. त्याप्रमाणे अर्जदाराने एक महिन्याच्या आत कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करावा. जर अर्जदार काही कारणामुळे अर्ज दाखल करू शकला नसेल तर त्याला दहा दिवसांची मुदत देण्यात यावी. अशाप्रकारे कमाल दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सदर अर्जावर कार्यवाही पूर्ण करावी.
या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला प्राप्त झालेल्या अर्जांचे पूर्ण व अपूर्ण अर्जांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद यांनी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना, मुंबई यांच्याकडे कार्यालयाकडे सादर करावा.
विविध जबाबदाऱ्या व कार्यपद्धती-
लेक लाडकी या योजनेअंतर्गत लाभ देण्यासाठी वेबसाईटवर वरती पोर्टल वरती लाभार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा मुख्य सेविका यांनी करावी तसेच लाभार्थ्यांचे अर्ज व सर्व कागदपत्रे पोर्टल व अपलोड करावी.
लेक लाडकी योजनेच्या लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका संबंधित मुख्य सेविका यांचे राहील. अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातर जमा करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
अर्ज सादर केल्यानंतर सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत असून आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येतील.
ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांनी लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती करणे तपासणी करणे व पोर्टलवर अपलोड करणे.
अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी अपलोड केलेले अर्ज पोर्टलवर पूर्णपणे अपलोड केल्यानंतर सक्षम अधिकारी यांनी खातर जमा करावी. आयुक्तालय सारावरील राज्य कक्षातील कर्मचारी यांनी तसेच जिल्हा स्तरावरील अधिकारी यांनी सदर अर्ज व्यवस्थित सेव करून लाभार्थ्याला लाभ मिळेल पर्यंत जतन करून ठेवावे.
एखादा लाभार्थी कुटुंब या योजनेअंतर्गत किंवा काही टप्प्यामध्ये लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ घेण्यासाठी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. सदर अर्जाची संबंधित अधिकाऱ्यांनी छाननी करून पातळ ठरत असल्यास राज्यकक्षाकडे शिफारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात यावा त्याचप्रमाणे एखादी लाभार्थी कुटुंब या योजनेतील एक अथवा काही टप्प्यामधील लाभ घेतल्यानंतर राज्य बाहेर स्थलांतर झाले असल्यास थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावे व या राज्यकर्त्यांनी याबाबत अंतिम निर्णय घ्यावा.
दिनांक 1 एप्रिल 2023 अगोदर जन्मलेल्या मुलीस माजी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अटी व शर्ती लाभ दिला जाईल.
Ladli Behna Yojana Maharashtra Online Apply | माझी लाडकी बहीण योजना
अशाप्रमाणे आपण लेक लाडकी योजना या अंतर्गत लाभ कसा घ्यायचा व किती रक्कम मिळणार आहे याबाबत आपण माहिती पाहिली आहे.
जर तुमच्याही कुटुंबामध्ये जर एक एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झाला असेल तर तुमच्या कुटुंबातील मुलीला मुख्यमंत्री राजश्री योजना महाराष्ट्र यामध्ये म्हणजेच लेक लाडकी योजना या अंतर्गत तुमच्या मुलीला अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा पात्र लाभार्थी असाल तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन जी कागदपत्रे लागतात त्याच्या झेरॉक्स घेऊन त्यांच्याकडे फॉर्म भरून द्या.
तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्हाला सुद्धा एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम हवी असेल तर Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra यांच्याकडून मिळणार आहे.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी महा सरकार या साईटला भेट आवश्यक द्या.