आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म नवीन GR नुसार कसा भरायचा ते Ladli Behna Yojana Maharashtra Online Apply कसा करायचा ते पाहणार आहे.
Ladli Behna Yojana Maharashtra Online Apply |माझी लाडकी बहीण योजना
आपल्या सर्वांनाच माहित आहे की महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक आणि इतर सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये असा लाभ डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यात मिळत आहे. अजून सुद्धा काही महिलांचे काही ना काही कारणांमुळे ऑनलाइन फॉर्म भरायचे राहिलेले आहेत किंवा रिजेक्ट झालेले आहेत. ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहे त्यांच्यासाठी आपण Ladli Behna Yojana Maharashtra Online Apply कसा भरायचा ते पाहणार आहे.
Ladli Behna Yojana Online Apply Maharashtra
योजनेचे नाव- | मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना |
लाभार्थी – | 21 ते 65 वयोगटातील पात्र महिला |
लाभ- | 1500 रुपये महिना |
अर्जाची पद्धत- | ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज कोठे करायचा- | Apply Link |
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे. अगोदर हे जे अर्ज होते हे अर्ज घरबसल्या कोणीही ऑनलाईन भरू शकत होते. परंतु काही जणांनी फ्रॉड केल्यामुळे हे अर्ज आता ऑनलाइन भरता येत नाहीत. कारण महाराष्ट्र शासनाने 6 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन जीआर काढून ही माहिती दिलेली आहे. त्या जीआर मध्ये काय सांगितलेले आहे आणि आता फॉर्म कसा भरला जाईल ते आपण पुढील प्रमाणे पाहू.
शासन निर्णय दिनांक २/०९/२०२४ अन्वये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांना अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे.
Important Dates
अर्ज भरण्यास सुरुवात – | 1 जुलै 2024 |
अर्जाची शेवटची तारीख – | 30 सप्टेंबर 2024 |
अर्ज कोणाकडे द्यायचा – | अंगणवाडी सेविका |
आता तर तुम्हाला फॉर्म भरायचे असतील तर तुम्ही ते अंगणवाडी सेविका यांच्याकडे जो ऑफलाईन अर्ज आहे तो भरून तुमची जी कागदपत्रे आहेत त्याच्या झेरॉक्स अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायच्या आहेत. त्या अंगणवाडी सेविका तुमचे फॉर्म पाहून व तुमच्या झेरॉक्स आहेत ते पाहून तुमचे अर्ज ऑनलाईन भरणार आहेत. कारण आता महाराष्ट्र शासन यांनी अंगणवाडी सेविकाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकतात असे सांगितलेले आहे. त्यामुळे तुमच्या सुद्धा फॉर्म जर भरायचे राहिले असतील तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे ऑफलाईन अर्ज आणि त्याच्या ज्या झेरॉक्स असतील त्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करा. कारण आता नवीन GR नुसार फक्त गावातील अंगणवाडी सेविकाच फक्त तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फोर्म भरू शकते असे सांगितले आहे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.
- राज्यातील विवाहित घटस्फोटीत विधवा व निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
- किमान वयाची 21 वर्षे पूर्ण असावी व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
- लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे 1) रेशन कार्ड 2) जन्म प्रमाणपत्र 3) मतदान ओळखपत्र 4) शाळा सोडल्याचा दाखला.
- पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
- अर्जदाराचे हमीपत्र
- अर्जदाराचा फोटो
- आधार कार्ड ला लिंक असलेले बँक पासबुक
अर्ज कोठे करायचा – अंगणवाडी सेविका यांच्या कडे
अशा प्रकारे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत Ladli Behna Yojana Maharashtra Online Apply नवीन GR नुसार कसा करायचा ते पहिला. तुम्ही जर अजून सुद्धा फोर्म भरला नसेल तर वरील जी कागदपत्रे सांगितली आहेत ती XEROX आणि मुळ कागदपत्रे घेऊन तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे ती कागदपत्रे द्या आणि तुमचा फोर्म अंगणवाडी सेविका कडून भरून घ्या.
अशाप्रकारे आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म कसा भरायचा याची माहिती पाहिली आहे.